लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा स्थापना दिवस साजरा

दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा (सीएमई) ७९ वा स्थापना दिवस बुधवारी (ता. २८) उत्साहात साजरा करण्यात आला.
Military Engineering College
Military Engineering Collegesakal
Updated on
Summary

दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा (सीएमई) ७९ वा स्थापना दिवस बुधवारी (ता. २८) उत्साहात साजरा करण्यात आला.

पुणे - दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा (सीएमई) ७९ वा स्थापना दिवस बुधवारी (ता. २८) उत्साहात साजरा करण्यात आला. स्थापना दिनानिमित्त सीएमईचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पी. पी. मल्होत्रा यांनी सर्व अधिकारी आणि नागरिकांसाठी विशेष संमेलन आयोजित केले. उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या सर्वांना यावेळी सुवर्ण आणि रौप्य पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर्व प्रशिक्षणार्थींनी आगामी काळात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्यासाठी स्वतःला समर्पित करावे, असे आवाहन लेफ्टनंट जनरल मल्होत्रा यांनी यावेळी केले.

रूरकी येथील थॉमसन महाविद्यालयात २८ सप्टेंबर १९४३ रोजी लष्करी अभियांत्रिकी शाळा म्हणून या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. १९४८ साली हे विद्यालय पुण्यात हलविण्यात आले. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अशा विविध मान्यवरांनी या महाविद्यालयाला भेट दिली आहे. २८ सप्टेंबर २०१८ रोजी या महाविद्यालयाने आपला पंचाहत्तरावा स्थापना दिवस साजरा केला होता.

संघर्षाच्या आणि शांततेच्या संपूर्ण काळात समोर येणाऱ्या सुरक्षासंबंधी आव्हानांना तोंड देण्यास संरक्षण दलांना सक्षम करण्यासाठी सर्व प्रकारच्या अभियांत्रिकी आणि रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल आणि आण्विक संरक्षण संबंधी पैलूंबाबात उत्कृष्ट दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक प्रशिक्षण आणि आधुनिक पायाभूत सुविधांनी सज्ज अशी आघाडीची प्रशिक्षण संस्था बनण्याच्या दृष्टिकोनातून हे महाविद्यालय कार्यरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Water Dispute and Assault Case: Court Verdict
Unique Tradition: 'Ek Gaon Ek Ganpati' in Ranjangaon and Surrounding Areas
Marathi News Esakal
www.esakal.com