रेम्बो सर्कसचे संस्थापक पी. टी. दिलीप यांचे निधन

देशातील सर्कस उद्योगाला उभारी मिळावी यासाठी झटणारे आणि पुण्यातील जगप्रसिद्ध रॅम्बो सर्कसचे संस्थापक पी. टी. दिलीप यांचे अल्प आजाराने निधन झाले.
PT Dilip
PT DilipSakal
Summary

देशातील सर्कस उद्योगाला उभारी मिळावी यासाठी झटणारे आणि पुण्यातील जगप्रसिद्ध रॅम्बो सर्कसचे संस्थापक पी. टी. दिलीप यांचे अल्प आजाराने निधन झाले.

घोरपडी - देशातील सर्कस उद्योगाला उभारी मिळावी यासाठी झटणारे आणि पुण्यातील जगप्रसिद्ध रॅम्बो सर्कसचे संस्थापक पी. टी. दिलीप (वय- ७४) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पाश्‍चात पत्नी, विवाहित मुलगा, सुन, विवाहित मुलगी, एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे.

आज दुपारी दीड वाजता वानवडीमधील सेपल्कर दफनभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित शेकडो लोकांनी श्रद्धांजली अर्पण केली. भारतीय सर्कसचा आधारस्तंभ हरपला, अशा भावना व्यक्‍त केल्या.

पी. टी. दिलीप हे मुळचे केरळ येथील आहे. त्यांचे महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील लोके हायस्कूलमध्ये झाले. मोबाईल अ‍ॅम्युझमेंटमध्ये ते मॅनेजर म्हणून त्यांनी काम केले. नव्वदच्या दशकात त्यांनी तीन लहान सर्कस एकत्र केल्या. त्यानंतर ते घोरपडीमधील बी टी कवडे रस्ता परिसर येथे स्थायिक झाले. २६ जानेवारीच्या मूहुर्तावर त्यांनी रॅम्बो सर्कस उभी केली. या रॅम्बो सर्कसनी संपूर्ण आशियाचा दौरा केला.

सर्कसच्या माध्यमातून पुण्याचे नाव जगप्रसिद्ध केल्याबद्दल पुणे महानगरपालिकेतर्फे १९९२ मध्ये पी. टी. दिलीप यांचा विशेष गौरव करण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून सर्कसमध्ये प्राण्यांच्या खेळांवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे उताराला लागलेल्या सर्कसला उर्जीत अवस्था यावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न करीत केले.

सर्कसला मध्यवर्ती ठिकाणी कमी दरात मैदान मिळावे, यासाठी प्रत्येक शहरामध्ये त्यांनी खुप प्रयत्न केले. तसेच राज्य सरकारनेदेखील सर्कसला उद्योगाला आर्थिक पाठबळ द्यावे, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटात सर्कसला राज्य सरकारकडून मदत मिळावी, म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न करुन मदत मिळवून दिली. त्यांच्या कारर्किदीत त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com