रिक्षावाल्याचा राग आला म्हणून आधी पाठलाग केला, सापडला नाही तर दुसऱ्यांच्या गाड्या फोडल्या

Four arrested by Crime Branch pune for Vehicles vandalized in Mohmad Wadi
Four arrested by Crime Branch pune for Vehicles vandalized in Mohmad Wadi
Updated on

पुणे : दुचाकीवरुन आलेल्या टोळक्‍याने दहशत निर्माण करीत रस्त्यावर उभ्या केलेल्या सर्वसामान्य नागरीकांच्या वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार वानवडी येथील महंम्मद वाडी येथे गुरूवारी रात्री 12 वाजता घडला. या घटनेत तीन कार, दोन टेम्पोसह दुचाकींची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने चौघांना अटक केली आहे. अझर रौफ शेख (वय 21, रा. हांडेवाडी, हडपसर), कैफ मोहसीन शेख (वय 19, रा. सय्यदनगर, वानवडी), राहील सादिक शेख (वय 22, रा. लोहियानगर, हडपसर), अक्षय ज्ञानेश्वर जगताप (वय 22, रा. हडपसर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी संजय रांजने (वय 54, रा. महंम्मद वाडी रोड, हडपसर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रिक्षावाल्याचा राग सर्वसामान्यांच्या वाहनांवर 

काही दिवसांपूर्वी संबंधीत राहील शेख हा दुचाकीवरुन भरधाव जात होता. त्यावेळी एका रिक्षाचालकाने त्यास त्याची दुचाकी बाजुने आणि व्यवस्थित चालविण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने राहील व त्याच्या साथीदाराने रिक्षाचा पाठलाग सुरू केला. घाबरलेल्या रिक्षाचालकाने त्याची रिक्षा सय्यदनगरमधील ससाणे वस्तीमधील लेन क्रमांक 14 मध्ये लावली व रिक्षाचालक तेथून पळून गेला. त्यानंतर राहील व त्याचे अन्य साथीदारही तेथे आले. त्यांना रिक्षाचालक भेटला आला नाही, त्यामुळे त्यांनी गल्लीतील नागरीकांमध्ये दहशत निर्माण करीत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी तेथे दिसेल त्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरूवात केली. त्यामध्ये त्यांनी तीन कार, दोन टेम्पो, तीन दुचाकींची तोडफोड केली, त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. या घटनेत 48 हजार रुपयांचे नुकसान झाले. 

दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट पाचकडून याप्रकरणाचा समांतर तपास सुरू करण्यात आला. परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी केली. त्यावेळी वाहन तोडफोडीचा प्रकार साहील व त्याच्या साथीदारांनी केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनीच वाहनांची तोडफोड केल्याचे कबुल केले. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com