चिंचवडमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून;चौघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

पिंपरी : पूर्ववैमनस्यातून चौघांनी तरुणाला कोयता व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चौघांना ताब्यात घेतले आहे.

पिंपरी : चिंचवडमध्ये पूर्ववैमनस्यातून चौघांनी तरुणाला कोयता व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चौघांना ताब्यात घेतले आहे.

अमित पोटे ( वय 25, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमित व आरोपींमध्ये अनेक दिवसांपासून किरकोळ कारणावरून वाद होता. शनिवारी रात्री त्यांच्यात पुन्हा वाद झाला. दरम्यान, आरोपींनी पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून चिंचवडेनगर ते लक्ष्मीनगर या मार्गावर अमित यांच्यावर हल्ला केला. 

हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा रविवारी मृत्यू झाला. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four arrested for murder of Young boy in Chinchwad

टॅग्स