आंबेगावातील एका कुटुंबातील चौघेजण कोरोना...

mpd new.jpg
mpd new.jpg

महाळुंगे पडवळ (पुणे) : पुणे शहर व ग्रामीण पोलिस दलात काम करणारे अनुक्रमे कळंब (ता. आंबेगाव) येथील सुदर्शन कहडणे, पत्नी दीपाली कडहणे, मंचर उपजिल्हा रुग्णालयातील होमिओपॅथिक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा कहडणे व पती डॉ. सुहास कहडणे कार्यरत आहेत. एकाच कुटुंबांतील चार योद्धे कोरोनाविरुद्ध अहोरात्र सेवा देऊन कर्तव्य बजावत आहेत.

सुदर्शन कहडणे हे पोलीस आयुक्त पुणे शहर कार्यालयात पोलीस नियंत्रण कक्ष बिनतारी संदेश विभागात कार्यरत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अविरत सेवा देत आहेत. दीपाली कहडणे पोलीस हवालदार असून गुन्हे अन्वेषण विभागात ( सीआयडी) कार्यरत  आहेत. त्यांनी कोरोना बंदोबस्त नियोजन कामी आळेफाटा पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण येथे कर्तव्य बजावले आहे.

मुलाला नातेवाईकांकडे घोडेगाव येथे ठेवले आहे. डॉ. प्रतिभा कहडणे मंचर उपजिल्हा रुग्णालय येथे होमिओपॅथिक वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असून सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनरल ओपीडी रुग्णांना सेवा देत आहे. आयुष मंत्रालयाने सूचित केलेले रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे होमिओपॅथिक मेडिसिन  व इतर होमिओपॅथिक औषधे रुग्णांना देत आहेत.

डॉ. सुहास कहडणे हे मंचर येथे खासगी दवाखाना चालवून होमिओपॅथी औषोधोपचार करतात. गेल्या 2 महिन्यापासून उपजिल्हा रुग्णालयात खासगी डॉक्टरांच्या वतीने फ्लू क्लिनिक संकल्पना राबविण्यात आली आहे. त्या उपक्रमाची सुरवात स्वतः वैद्यकीय सेवा देऊन त्यांनी केली. येथे दररोज दोन खाजगी डॉक्टर्स मोफत सेवा देतात.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

सहकारी डॉक्टरांच्या मदतीने मंचर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी, राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यातील 200 डॉक्टरांना फेस शिल्ड,  मास्क, मंचर व घोडेगाव पोलीस कर्मचाऱ्यांना 100 फेस शिल्ड उपलब्ध करून दिले. गरजूंना होमिओपॅथिक औषधाचे मोफत वाटप केले आहे. भीमाशंकर कारखान्याच्या ऊसतोड कामगारांची वस्तीवर जाऊन तपासणी करण्याचे काम त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com