Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर आराम बस व ट्रक अपघातात चार ठार १५ जखमी

पुणे-सोलापूर महामार्गावर चौफुला (ता. दौंड) जवळ आराम बस व मालट्रक यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण ठार, तर १५ जण जखमी झाले.
Accident
Accidentsakal
Summary

पुणे-सोलापूर महामार्गावर चौफुला (ता. दौंड) जवळ आराम बस व मालट्रक यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण ठार, तर १५ जण जखमी झाले.

केडगाव - पुणे-सोलापूर महामार्गावर चौफुला (ता. दौंड) जवळ आराम बस व मालट्रक यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण ठार, तर १५ जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास वाखारी हद्दीत घडला.

अपघातात पुणे शहर पोलिस दलामध्ये सायबर सेलमध्ये कार्यरत असलेले पोलिस हवलदार नितीन दिलीप शिंदे (वय ३६, रा. भेकराईनगर, हडपसर, पुणे), आरती अंबाना बिराजदार (वय ३०, रा. घुलेवस्ती, हडपसर), अमर मानतेश कलशेट्टी (वय २०, रा. गोगाव, सोलापूर), गणपत मलप्पा पाटील (वय ५५, रा. कात्रज, पुणे) या चौघांचा मृतांमध्ये समावेश आहे. जखमींमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे.

जखमींमध्ये शंकर दिगंबर सरडकर (वय ३५), रेणूका शंकर सरडकर (वय ३०), श्रेयस शंकर सरडकर (वय ११), जान्हवी शंकर सरडकर (वय ६, सर्व रा. आंबेगाव, पुणे), नागेश शंकर बिरनोर (वय २५, रा. सोलापूर), राजू अरूण अंजनगावकर (वय २३, रा. सोलापूर), आकाश शिवाजी चव्हाण (वय २५, रा. हडपसर) जयश्री श्रीसेन सवळे (वय ४७, रा. कात्रज), बसवन्ना गजप्पा गजा (वय ४३), सोनाली बसवअण्णा गजा (वय १९, रा. दोघे रा. पुणे), अभिषेक बिराजदार (वय २१, रा. पुणे), तुषार वाघमारे (वय १६, रा. सोलापूर), श्रीदेवी रणजित वाघमैतर (वय ३२, रा. पुणे), सावन्ना गुंडप्पा जमादार (वय २५, रा. टिळेकरनगर, कात्रज), बसचालक शुभम संजय सुरवसे (वय २५, रा. हडपसर) या जखमींवर चौफुला व बोरीपार्धी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर किरकोळ जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री मालट्रक (एम एच १२ केपी ६६५०) पंक्चर झाल्याने तो रस्त्याच्या कडेला उभा होता. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आरामबस (एमएच १२ के क्यू ६६९६) मालट्रकवर पाठीमागून जोरात आदळली.

बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी होते. अपघातानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक केशव वाबळे, पोलिस उपनिरीक्षक पद्मराज गंपले व संजय नागरगोजे यांनी भेट दिली. व जखमींना रूग्णालयात दाखल केले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे करत आहे.

मालट्रक चालक सुदैवाने वाचला

मालट्रक पंक्चर झाल्याने चालक (नाव पत्ता समजू शकले नाही) ट्रकच्यामागे शेकोटी करून शेकत बसला होता. आरामबस वेगात मालट्रकवर धडकल्यावर मोठा आवाज झाला. धडक होताच शेकत बसलेला चालक जीव मुठीत धरून पळाला. ट्रकचालक अपघातात सुदैवाने वाचला. अपघातात बसच्या डावीबाजूकडील प्रवासी जखमी झाले. बसच्या डाव्या बाजूचा चुराडा झाला आहे. बस चालक धोकादायक पद्धतीने बस चालवत असल्याने प्रवासी व बसचालक यांच्यात अपघाताअगोदर वाद झाल्याचे फिर्यादी आकाश चव्हाण यांनी पोलिसांना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com