पुण्यात महिलेची पावणेचार लाखांची फसवणूक; अशी टाळा फसवणूक

पुण्यात महिलेची पावणेचार लाखांची फसवणूक; अशी टाळा फसवणूक

पुणे ः मोबाईलमधील सध्या सुरू असलेल्या सीमकार्डऐवजी अद्ययावत फोरजी सीमकार्ड देण्याचा बहाणा करून एका अनोळखी व्यक्तीने महिलेच्या बॅंक खात्यातील पावणे चार लाख रुपयांची रक्कम परस्पर काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी आंबेगाव खुर्द येथे राहणाऱ्या 54 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या मोबाईलवर काही दिवसांपुर्वी अनोळखी व्यक्तीने संपर्क साधला होता. त्यावेळी त्याने फिर्यादीस तो एका मोबाईल कंपनीतुन बोलत असल्याची बतावणी केली. त्यानंतर महिलेच्या मोबाईलमधील सध्याचे सीमकार्डऐवजी अद्ययावत फोरजी सीमकार्ड मोबाईलमध्ये टाकावे, अशी विनंती केली. तसे न केल्यास महिलेचा मोबाईल बंद पडेल, अशी भितीही त्याने महिलेस दाखविली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या प्रकारामुळे महिलेने अद्ययावत सीमकार्ड घेण्यास तयारी दर्शविली. त्यावेळी त्याने फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर एक लिंक पाठविली. संबंधीत लिंकमध्ये दिलेली माहिती भरण्यास सांगितले. त्यानुसार, महिलेने तिच्या बॅंक खात्यासंबंधीची गोपनीय माहिती संबंधीत लिंकमध्ये भरली. त्यानंतर काही वेळातच महिलेच्या बॅंक खात्यामध्ये असलेली पावणे चार लाख रुपयांची रक्कम अनोळखी व्यक्तीने काढून घेतली. खात्यातील पैसे काढल्याचा मेसेज महिलेच्या मोबाईलवर आल्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) अर्जुन बोत्रे करीत आहेत. 

फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी 
* अनोळखी व्यक्तींना बॅंक खात्यासंबंधीची गोपनीय माहिती देऊ नका. 
* केवळ फोन, ईमेल किंवा चॅटद्वारे होणाऱ्या संपर्कावर विश्‍वास ठेवून आर्थिक व्यवहार करु नका. 
* संशयास्पद ईमेल, मेसेज, लिंक, फोनला प्रतिसाद देऊ नका 
* ऑनलाईन व्यवहार करताना कुटुंबीयांना कल्पना द्या. 
* संपुर्ण माहिती असल्याशिवायक ई-बॅंकींग, ई-वॉलेटचा वापर करु नका. 
* कोणालाही ओटीपी क्रमांक देऊ नका. 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com