
पुणे : पुणे महापालिकेची निवडणूक दिवाळीपूर्वी की नंतर अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगलेली असताना मंगळवारी राज्य सरकारने पुणे महापालिकेसाठी चार सदस्यांचा प्रभाग करण्याचा आदेश दिला. त्यामुळे महापालिकेची निवडणूक शाखा लवकर प्रारूप प्रभाग रचनेचे काम सुरु करेल.