
घोडेगाव - मंचर (ता. आंबेगाव) येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या परराज्यातील टोळीतील ४ आरोपींना मंचर पोलिसांनी अटक केले आहे. त्यांच्या जवळून १३ लाख २० हजार ४७८ रुपयांचा चारचाकी गाडी सह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घोडेगाव न्यायालयाने त्यांना दहा दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. अशी माहिती खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी शुक्रवार (ता. १०) रोजी मंचर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.