
पुणे | सहा दिवसांच्या मुलाला ताम्हिणी घाटात फेकलं, शोध सुरू
पुण्यातील मुळशीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने पुणे-माणगाव रस्त्यावर असणाऱ्या ताम्हिणी घाटातून एका सहा दिवसांच्या मुलाला फेकून दिल्याचं तपासात उघड झालं आहे. संबंधित गुन्हेगारासोबत त्यांच्या अन्य तीन मित्रांनाही पोलिसांनी अटक केली आहे. महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोधकार्य सुरू केलं आहे. (Pune crime news)
पुणे-माणगाव रस्त्यावरील ताम्हिणी घाटात हा प्रकार घडला आहे. शनिवारी पहाटे, पौड पोलिसांनी बाळाच्या हत्येप्रकरणी रत्नागिरीतील खेडमधून चार जणांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी यासंदर्भात महिती दिली आहे. 'मुलाच्या आईने शुक्रवारी पोलिसात तक्रार दाखल केली होती. सध्या बाळाचा शोध सुरू आहे.
संबंधित महिला शेळके वस्तीत वास्तव्यास आहेत. रत्नागिरीतील खेड हे तिचं मूळ गाव आहे. या ठिकाणी महिलेचे एका २७ वर्षांच्या व्यक्तीची संबंध होते. घटनेचा माहिती मिळताच आम्ही संबंधित व्यक्तीला त्याच्या भावाला आणि इतर दोघांना अटक केली आहे. पौडमध्ये 30 जानेवारीला महिलेची प्रसूती झाली होती.
यावेळी महिलेचे संबंध असणारा पुरुष आणि त्याचे मित्र प्रसूतीसाठी आले होते. ५ फेब्रुवारीच्या पहाटे हे चारजण महिलेसोबत खेडला जाण्यासाठी निघाले. यावेळी ते ताम्हिणीतील पुलावर थांबले आणि महिलेच्या हातातून बाळाला घेऊन गेले. तासाभराने ते परतले आणि गाडीत बसून निघून गेले. अखेर महिला खेडहून परतली. यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला, असं पोलिसांनी सांगितलं.
Web Title: Four Men Arrested For Throwing Six Days Old Boy In Tamhini Valley Of Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..