police suspended
पुणे - ‘आम्ही पोलिस आहोत; आमचे कोणी काहीही करू शकत नाही’ अशा उर्मट शब्दांत व्यापाऱ्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हे शाखेतील चार पोलिस अंमलदारांना निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे चौघेही विश्रांतवाडी परिसरात ‘कॉप्स २४ बीट मार्शल’ म्हणून कार्यरत होते. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी ही कारवाई केली.