UPSC Result 2020: 'यूपीएससी'त चमकले पुणे विद्यापीठातील चार तारे!

UPSC_Pune_University_Students
UPSC_Pune_University_Students

UPSC Result 2020 : पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रात अभ्यास करणारे चार विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत चमकले आहेत. यामध्ये अतीश कांबळे याला ६५१ वा रँक मिळाला आहे, करुण गरड याचा ६५६, सौरभ व्हटकर याचा ६९५, तर अजिंक्य विद्यागर याचा ७८९ वा रँक आला आहे. हे चारीही यशस्वी विद्यार्थी गेले दोन वर्ष पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शन केंद्रात अभ्यास करत होते, तसेच त्यांनी 'यशदा'मध्येही मार्गदर्शन घेतले आहे. 

अतीश कांबळे हा मॅकेनिकल इंजिनीअर असून, तो मूळचा उमरगा तालुक्यातील एकुरगा येथील आहे. त्याने सहाव्या प्रयत्नात यश मिळवले आहे. बार्शी येथील अजिंक्य विद्यागर याने पुणे विद्यापीठातूनच एम.ए. राज्यशास्त्र केले आहे. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळाले. सौरभ व्हटकर हा कोल्हापूरचा असून, दुसऱ्या प्रयत्नात त्याने हे यश मिळवले आहे. 

मार्गदर्शन केंद्राचे प्रा. चित्तरंजन दास म्हणाले, "पुणे विद्यापीठाच्या केंद्रातील चौघांना यश मिळाले आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ३ वर्षाच्या 'आयसीएसी' कोर्स तसेच इतरांसाठी एमपीएससी, यूपीएससीचे मार्गदर्शन ऑक्टोबरपासून सुरू केले जाणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com