पुण्याची दुचाकींचे शहर अशी ओळख पुसतेय, कारण...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

पुणे : दुचाकीचे शहर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात दसऱ्यानिमित्त नवीन दुचाकींच्या नोंदणीत घट झाली आहे. यावर्षी पुणेकरांनी चारचाकी खरेदी करण्यास प्राधान्य दिल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मागील वर्षाच्या तुलनेत चारकीच्या नोंदणीमध्ये तब्बल 64 टक्‍क्‍यांची वाढ झालेली आहे. तर दुचाकींची नोंदणी सलग तिसऱ्यावर्षीही घटलेली आहे.

दसऱ्याच्या मुहुर्तावर नागरिक मोठ्या प्रमाणावर नवीन वाहन खरेदी करत असतात. खरेदी केलेली वाहन प्रादेशक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) नोंदणी करण्यात येते. त्याच दिवशी वाहनांची नोंदणी करुन नागरिकांना ही वाहन पुजनासाठी घरी घेऊन जाता यावीत, म्हणून आरटीओ कार्यालय दसऱ्याच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आले होते. या एका दिवसामध्ये आरटीओकडे 5 हजार 932 वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये चारचाकी वाहनांच्या नोंदणीत मोठी वाढ झालेली आहे. तर दुचारीच्या नोंदणीमध्ये मागील दोन वर्षाच्या तुलनेत घट झाली असून 3 हजार 852 दुचाकींची नोंदणी दसऱ्याच्या दिवशी झाली आहे.

मागील दसऱ्यानिमित्त 4 हजार 115 दुचाकींची नोंदणी आरटीओकडे झालेली होती. एका दिवसामध्ये कार्यालयास सुमारे 23 कोटी 19 लाख रुपयांचा महसूल देखील मिळाला असल्याची माहिती पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four-wheel registration in Pune increases by more than 60 percentage