ओतूर : डिंगोरे ता.जुन्नर गावच्या हद्दीत अहिल्यानगर कल्याण महामार्गावर हॉटेल जीवनदिप जवळ एस टी बस व दुचाकीचा अपघात होऊन चार जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे..हा अपघाता रविवारी रात्री ८ वाजे दरम्यान झाला असून या अपघाताच चार जण ठार झाले असून आशिष ढवळु भले वय.२४ ,दिपक सखाराम भले वय.२८ दोघे रा.मराडवाडी,फाळुकदरा ,डिंगोरे ता.जुन्नर.शिवराम नारायण पारधी वय.२६ व खंडु नारायण भले वय.२५ दोघे रा.आंबेदरा, डिंगोरे ता.जुन्नर असे या अपघातात मृत तरुणांची नावे आहेत.या अपघात विठ्ठलवाडी पाथर्डी एस टी बस क्र. एम एच २० बी एल २९८३ व दुचाकी स्प्लेंडर क्र. एम एच १४ एम ए ७८४९ यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे..या अपघाता बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की विठ्ठलवाडी पाथर्डी एस टी बस माळशेज घाट मार्गे ओतूरच्या दिशेने येत होती.त्याच वेळी ओतूरच्या दिशेकडून डिंगोरे कडे दुचाकीवर चार तरूण चालले होते. हॉटेल जीवनदीपच्या थोडे पुढे एस टी बस ने दुचाकीला जोरदार धडक देऊन भिषण अपघात झाला या अपघात दूचाकीवरील चार ही तरुण गंभीर जखमी झाले.त्यातील तीन तरुणांना ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता येथील वैद्याकीय अधिकारी श्रीहरी सारोक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.प्रशात गोरे व डॉ.वैष्णवी ठिकेकर यांनी त्यांना मृत घोषित केले. तर इतर एक तरुणाला आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होता परंतु तो ही तेथे डॉकटरानी मृत घोषित केले..सदर अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव व इतर पथकाने घटनास्थळी धाव घेऊन अपघात ग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.पुढिल तपास ओतूर पोलिस करत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.