नवले पुलाजवळ आठ दिवसांत चौथा अपघात; जीवित हानी नाही

नवले पूल बनतोय कर्दनकाळ
नवले पुलाजवळ आठ दिवसांत चौथा अपघात; जीवित हानी नाही
नवले पुलाजवळ आठ दिवसांत चौथा अपघात; जीवित हानी नाही sakal

धायरी : बंगळुरू मुंबई महामार्गावर नऱ्हे येथील नवले पुल परिसरात आठ दिवसांत चौथा अपघात झाला आहे. कुठल्याही प्रकारची जीवित हानी नाही, पंचवीस फूट महामार्गावर खाली आला ट्रक. सेल्फी पॉइंट येथे गुरुवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट सेवा रस्त्यावर गेला.

नवले पुलाजवळ आठ दिवसांत चौथा अपघात; जीवित हानी नाही
शक्तिकांत दासच RBIचे गव्हर्नर; कॅबिनेटने तीन वर्षांसाठी वाढवला कार्यकाळ

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक चालक मात्र जखमी झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. दरम्यान ट्रक महामार्गावरून खाली सेवा रस्त्यावर आला. व पुढे सेवा रस्त्यालगत असणाऱ्या रॉयल रेस्टो बारच्या पायऱ्यांना धडकला. सुदैवाने ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक चालक मात्र जखमी झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com