
पुणे -एकीकडे कोरोना यासारख्या घातक विषाणूशी पुणे महापालिका दोन हात करीत असताना, दुसरीकडे आरोग्य विभागातील तुटपुंज्या मनुष्यबळाच्या विरोधातही त्यांना लढाई करावी लागत आहे.
महापालिकेच्या आरोग्य खात्यात तज्ञ डॉक्टरांच्या १५१ पैकी जेमतेम सात जागा भरलेल्या आहेत. उर्वरित १४४ रिक्त जागा आहेत. आरोग्य खात्यासाठी मंजूर असलेल्या सर्व वर्गाच्या एकूण जागांपैकी ४४ टक्के जागा या रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठीची मोहीम महापालिकेकडून अशावेळी उघडली आहे.
पायाभूत सुविधांबरोबरच प्राथमिक आरोग्य पुरविण्याची जबाबदारी मुंबई महापालिका अधिनियमानुसार महापालिकांवर आहे. त्यानुसार पुणे महापालिकेच्या आरोग्य खात्यात सुमारे एक हजार ६६९ मंजूर जागा आहेत. सध्या कोरोना विषाणूचा धोका पुणे शहराला वाढला आहे. पुणे शहरात या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. त्याच्याशी लढण्यासाठी महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. परंतु अपुऱ्या मनुष्यबळामुळे ही लढाई लढण्यास महापालिका प्रशासनाला मर्यादा येत आहे. १५१ शिवाय, वर्ग दोनच्या सुमारे २६४ जागा मंजूर आहेत. त्यापैकी ७८ जागा रिक्त आहेत. तर वर्ग ३ च्या ५११ पैकी २३८ जागा रिक्त आहेत. वर्ग ४ च्या ७४३ जागा मंजूर असून, त्यापैकी २७३ जागा रिक्त आहेत. एकूण १ हजार ६६९ पैकी सुमारे ७३३ जागा रिक्त आहेत. त्यामुळे मान्य जागा पैकी ४४ टक्के जागा या रिक्त आहेत.
महापालिकेतील भरती हा नगर विकास खात्याशी संबंधित विषय आहे. सध्याची आपत्कालीन परिस्थिती पाहता या जागा भरणे महत्त्वाचे आहे. महापालिका आयुक्तांनी याबाबतचा प्रस्ताव तातडीने राज्य सरकारकडे पाठवावा. राज्य सरकार त्यावर लवकर निर्णय येईल.
- राजेश टोपे, आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य
का रिकाम्या राहतात जागा
महापालिकेची आरोग्य विभागातील वर्ग १ साठीच्या पदासाठी वेतनश्रेणी ही खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना मिळणाऱ्या वेतनाच्या तुलनेत अतिशय कमी आहे. त्यामुळे अनेकदा जाहिरात काढूनदेखील या जागा भरल्या जात नाही. याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. मात्र महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागातील काही अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे त्याबाबतचा निर्णय होऊ शकलेला नाही. परिणामी अशा परिस्थितीत तरी या रिक्त पदांच्या बाबतीत महापालिकेतील सत्ताधारी तातडीने निर्णय घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.