18 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

पुणे : ''साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्य वतीने 23, 24 डिसेंबरला आयोजित केलेल्या जाणाऱ्या 18 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो भूषविणार आहेत.'' ,अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, संमेलनाचे प्रमुख संयोजक दिलीप बराटे यांनी सांगितले. 

नियोजित अध्यक्ष फादर फ्दिब्रिटो यांची 20 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अभ्यासू लेखक आणि संवेदनशील समाजसेवक म्हणून त्यांचा परिचय आहे. कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात 23, 24 डिसेंबरला दोन दिवसीय संमेलनात चित्रप्रदर्शन, कथाकथन, विविध विषयांवरील परिसंवाद , तसेच साहित्य आणि कला क्षेत्रातील दिग्गजांच्या  मुलाखती होणार आहेत.

दरम्यान, या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. आ.ह. साळुंखे, डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. सदानंद मोरे, प्रा. रा.ग. जाधव, डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. आनंद यादव, राजन खान, डॉ. अश्विनी धोंगडे, डॉ. यशवंत मनोहर, रामदास फुटाणे, फ.मु. शिंदे, उत्तम कांबळे आणि डॉ. निशिकांत मिरजकर यांनी भूषविले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fr. Francis Dibrieto president of the 18th Literary Art Conference