
पुणे : मुळशीतील माले येथे विविध सोई-सुविधायुक्त फार्महाऊससाठीच्या जमीनीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून, प्रत्यक्षात संबंधीत जमिनीवर सोई-सुविधा उपलब्ध करुन न देता ग्राहकाची एक कोटी 85 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पौड पोलिस ठाण्यात दोन विकसकांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश मदनलाल छाजेड, मनोज मदनलाल छाजेड (दोघेही रा. शुक्रवार पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्या विकसकांची नावे आहेत. याप्रकरणी श्वेता मोदी (वय 37, रा. हडपसर) यांनी पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मोदी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी मोदी यांचे पती केयुर किरीटकुमार मोदी यांची मनोज छाजेड व त्याचा भाऊ मुकेश छाजेड यांच्याशी ओळख होती. त्यातूनच त्या दोघांनी फिर्यादीच्या पतीला त्यांची मुळशी तालुक्यातील माले येथे आपली 43 एकर 12 गुंठे शेतजमीन असून तेथे आपण "सेरेना फार्मस' या नावाने फार्महाऊस प्रकल्प राबवित असून त्यामध्ये फिर्यादीस गुंतवणूक करण्याची गळ घातली.
संबंधीत शेतजमीनीवर प्रत्येक एक एकर जमीफार्महाऊस नियोजित असून फार्महाऊसच्या प्लॉटपर्यंत जाण्यासाठी कॉंक्रीटचे पक्के रस्ते व गटारे, पाण्याची सोय, ड्रिप इरीगेशन, वीज जोडणी, क्बल हाऊनस, व्यायामशाळा, जलतरण तलाव, जंगल ऍडव्हेंचर क्बल, नेचर फॉरेस्ट रिसॉर्ट, कॉटेजस, जंगल सफारी अशा अद्ययावात सोई-सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामध्ये गुंतवणूक केल्यास दोन वर्षात त्याच्या किंमती तीन पट होतील, अशी बतावणी केली. त्यांच्या भुलथापांना बळी पडून फिर्यादींनी पतीच्या नावे एक एकराचे पाच प्लॉट, तर स्वतःच्या दोन असे एकूण सात प्लॉटच्या खरेदीपोटी मुकेश व मनोज छाजेड यांना खरेदीखत करतेवेळी एक कोटी 85 लाख रुपयांची रक्कम विविध बॅंक खात्यांवर दिली. त्यानुसार त्यांनी 2019 पर्यंत फार्महाऊससाठी आवश्यक सर्व सोई-सुविधा देण्याचे कबुल केले होते. परंतु अद्यापर्यंत विकसकांनी कोणत्याही प्रकारच्या सोई-सुविधा दिल्या नाहीत. त्यामुळे फिर्यादींना तेथे फार्महाऊस बांधता आले नाही.
फार्महाऊच्या जमीनीच्या विक्रीच्यावेळी त्यांनी दिलेला नकाशा देखील प्राधिकृत अधिकाऱ्यांनी मंजुर केला नाही, तसेच संबंधीत प्रकल्प विकसनास आवश्यक कायदेशीर परवानगीही घेतली नसल्याचे फिर्यादींच्या निदर्शनास आले. संबंधीत विकसकांनी फिर्यादीसह अन्य 31 गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. दरम्यान, फिर्यादी यांनी विकत घेतलेल्या जमीनीमध्ये त्यांच्या प्रतिनीधींना जाण्यास मज्जाव करीत हातपाय तोडण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.