पोस्टात नोकरी लावण्याच्या अमिषाने 85 जणांची 19 लाख 70 हजारांची फसवणूक

पोष्ट खात्यात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून तालुक्यातील विविध गावांमधील 85 जणांकडून 19 लाख 70 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी तरुणावर भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
Dnyaneshwar Vare
Dnyaneshwar VareSakal
Summary

पोष्ट खात्यात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून तालुक्यातील विविध गावांमधील 85 जणांकडून 19 लाख 70 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी तरुणावर भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

भोर(पुणे) - पोष्ट खात्यात (Post Department) नोकरी (Job) लावण्याचे अमिष दाखवून तालुक्यातील विविध गावांमधील 85 जणांकडून 19 लाख 70 हजार रुपये घेऊन फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी वरोडी खुर्द येथील तरुणावर (Youth) भोर पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला. ज्ञानेश्वर शिवाजी वरे असे फसवणूक करणा-या तरुणाचे नाव असून त्याने मार्च 2020 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये तब्बल 85 जणांकडून पैसे घेतलेले आहेत. निलेश तानाजी तावरे (रा.चिखलगाव) याने त्याच्याविरोधात पोलिसात फिर्याद दाखल केली.

याबाबत भोर पोलिसांनी दिलेली माहिती अशी - आरोपी ज्ञानेश्वर वरे हा फिर्यादी निलेश तावरे यांचा नातेवाईक आहे. मार् 2020 मध्ये त्याने निलेशला पोष्ट खात्यात नोकरी लावतो असे सांगून त्याच्याकडून 2 लाख रुपये घेतले. तुला पोष्टात नोकरी लागल्याचे सांगत ज्ञानेश्वरने निलेशचा विश्वास संपादन केला. आणि तुझ्या इतर मित्रांनाही नोकरी लावतो असे सांगितले. निलेशने त्याच्या मित्रांना सांगितल्यानंतर 85 जणांनी त्यास 19 लाख 70 हजार रुपये वेळोवेळी दिले.

Dnyaneshwar Vare
गुंड गजा मारणेची पत्नी राष्ट्रवादीत; भाजपचे १५ नगरसेवकही वाटेवर?

प्रत्येक मुलाकडून 20 हजारांपासून ते दीड लाख रुपये अशा प्रकारे पैसे घेतले. निलेशने सर्व रक्कम ही ज्ञानेश्वर वरे यास दिली. फिर्यादी निलेशने आरोपी ज्ञानेश्वर यास 13 लाख 1 हजार 661 एवढी रक्कम ऑनलाईन आणि 6 लाख 68 हजार 339 रुपये रोख दिली.

दरम्यान पैसे देवून कित्येक महिने झाल्यानंतर नेमणूकीचे पत्र नसल्यामुळे काही मुलांनी पैसे परत मागण्यास सुरुवात केली. त्यानंतर ज्ञानेश्वरने काहींना चेक दिले. खात्यात पैसे नसल्यामुळे चेक परत आल्यावर मुलांनी त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपी ज्ञानेश्वर हा दोन महिन्यांपासून फोन बंद करून गायब झाला. त्यानंतर निलेशने त्याच्याविरोधात भोर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी ज्ञानेश्वर वरे याच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक राहूल साबळे पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com