
हवेली पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास विभागाकडून अंगणवाडी सेविकांकडे अॅप्रनसाठी प्रत्येकी तीनशे पन्नास रुपयांची मागणी केली जात आहे. त्याची कोणतीही पावती अंगणवाडी सेविकांना देण्यात येत नाही. याअगोदरही अंगणवाडी सेविकांकडून कोरोना लशीसाठी म्हणून प्रत्येकी अठ्ठाविस रुपये घेण्यात आलेले आहेत. तसेच काही नोंदी ठेवण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेल्या रजिस्टरचे पैसेही अंगणवाडी सेविकांकडून उकळण्यात आलेले आहेत.
किरकटवाडी : अगोदरच कमी, अवेळी मिळणाऱ्या मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांची कोरोना लस व इतर वेगवेगळ्या नावाखाली उघडपणे लुट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार हवेली तालुक्यात सध्या सुरू असून याबाबत हवेली पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांना सक्ती नसल्याचे सांगितले आहे,मात्र पर्यवेक्षकांकडून प्रत्येक अंगणवाडी सेविकांकडे सक्तीने पैशांची मागणी केली जात असल्याचे अंगणवाडी सेविकांनी सांगितले आहे.
हवेली पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास विभागाकडून अंगणवाडी सेविकांकडे अॅप्रनसाठी प्रत्येकी तीनशे पन्नास रुपयांची मागणी केली जात आहे.त्याची कोणतीही पावती अंगणवाडी सेविकांना देण्यात येत नाही. याअगोदरही अंगणवाडी सेविकांकडून कोरोना लशीसाठी म्हणून प्रत्येकी अठ्ठाविस रुपये घेण्यात आलेले आहेत. तसेच काही नोंदी ठेवण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेल्या रजिस्टरचे पैसेही अंगणवाडी सेविकांकडून उकळण्यात आलेले आहेत.
PSI महिला अधिकाऱ्याशी लव्ह मॅटर; पोलिस शिपायाने ठाण्याच्या टेरेसवरुनच मारली उडी
अंगणवाडी सेविका म्हणून काम करणाऱ्या महिला सर्वसाधारण कुटुंबातील आहेत. अनेक महीलांना इतर आधार नसल्याने याच तुटपुंज्या मानधनावर त्या आपल्या कुटुंबाचा खर्च भागवतात, शिवाय मानधनही वेळेवर मिळेल याची शाश्वती नसते. त्यातच आता वेगवेगळी कारणे सांगून पैसे गोळा केले जात असल्याने अंगणवाडी सेविकांमध्ये संतापाची भावना आहे. परंतु वरिष्ठांच्या दबावामुळे व नोकरी जाण्याच्या भीतीमुळे अंगणवाडी सेविका जाहीरपणे बोलणे टाळत आहेत, असे काही अंगणवाडी सेविकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
"यापूर्वी काही कारणांनी अंगणवाडी सेविकांकडे पैसे मागितले गेले असतील तर त्याबाबत माहीती नाही.मी काही महिन्यांपूर्वीच येथे नियुक्तीवर आलो आहे. अॅप्रनसाठी अंगणवाडी सेविकांना सक्ती करण्यात आलेली नाही. सादील खर्चातून अॅप्रनसाठी पैसे देण्यात यावेत व त्याची पावती देण्यात यावी असे पर्यवेक्षकांना कळवले आहे. अद्याप कोणाकडूनही पैसे घेण्यात आलेले नाहीत."
- महेंद्र वासनिक, एकात्मिक बालविकास अधिकारी, पंचायत समिती हवेली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा