
प्रकाश बबन कोळेकर (रा.भवानीनगर) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार प्रकाश कोळेकरे यांचा मुलगा आशिष याचे शिक्षण १३ वी झाले आहे. वरील पाच जणांनी आशिषला पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लिपिक पदावरती नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दहा लाख रुपयांची मागणी केली होती. साडेसात लाख रुपये देण्याचे ठरले.
वालचंदनगर : भवानीनगर (ता.इंदापूर) येथील युवकाची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नाेकरी लावण्याच्या बहाण्याने बनावट नियुक्तीपत्र देवून 3 लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी सिद्धार्थ देविदास झेंडे, प्रगती सिद्धार्थ झेंडे (रा.दोघे,म्हसोबाचीवाडी), बबन सिताराम दळवी, पुष्पा बबन दळवी (रा.दोघे, डोर्लेवाडी, ता.बारामती) व किरण लव्हाजी मदने (रा.३५ फाटा,ढेकळवाडी ता.बारामती) यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी प्रकाश बबन कोळेकर (रा.भवानीनगर) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार प्रकाश कोळेकरे यांचा मुलगा आशिष याचे शिक्षण १३ वी झाले आहे. वरील पाच जणांनी आशिषला पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लिपिक पदावरती नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दहा लाख रुपयांची मागणी केली होती. साडेसात लाख रुपये देण्याचे ठरले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
३ फेब्रुवारी २०२० रोजी यातील ५ लाख रुपये रोख स्वरुपामध्ये घेवून मंत्रालयातील लिपिक पदाचे नियुक्तीपत्र देवून ४ मार्च २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हजर राहण्यास सांगितले. मात्र बनावट नियुक्तीपत्र असल्याने त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हजर करुन घेतले नाही. ७ दिवसानंतर झेंडे याने ऑर्डर काढण्यासाठी २५ हजार रुपये साहेबांना देण्याचे कारण सांगून प्रगती झेंडेच्या खात्यावर ९ मार्च २०२० रोजी पैसे घेतले.
कोळेकर यांचा विश्वास संपादन करण्यासाठी झेंडे याने ५ लाख रुपयांचा व बबन दळवी याने ४ हजार ७५ हजार रुपयांचा धनादेश दिला होता. दोन्ही धनादेश बाउन्स झाल्यामुळे कोळेकर यांनी पैशाची वेळोवेळी मागणी केल्यामुळे त्यांना १ लाख ३० हजार रुपये परत दिले असून 3 लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी वरील पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.