Kalyani Nagar Accident : अग्रवाल पिता-पुत्राकडून जमीन व्यवहारातही फसवणुक

कोंढवा पोलिस ठाण्यात सुरेंद्र अग्रवाल, विशाल अग्रवालविरुद्ध पाचवा गुन्हा दाखल
Kalyani Nagar Accident
Kalyani Nagar Accidentesakal

पुणे ः कल्याणीनगर अपघात प्रकरणातील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, त्याचा वडील सुरेंद्र अग्रवाल यांनी कोंढवा भागातील जमीनीच्या व्यवहारातही एक कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणामध्ये अग्रवाल पिता-पुत्राविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध दाखल झालेला हा पाचवा गुन्हा आहे.

Kalyani Nagar Accident
New Economic Policy : नव्या सरकारच्या धोरणांवर बाजाराची दिशा;गुंतवणुकीत वैविध्य ठेवण्याचा अर्थतज्ज्ञांचा सल्ला

सुरेंद्र ब्रह्मदत्त अग्रवाल (वय ७७), मुलगा विशाल (वय ५०), जसप्रीतसिंग राजपाल अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध मुश्‍ताक शब्बीर मोमीन (वय ४५, रा. कौसरबाग, कोंढवा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kalyani Nagar Accident
Chhatrapati Sambhajinagar News : अखेर ३०० होर्डिंग्जचे; आले ऑडिट अहवाल

फिर्यादी मुश्‍ताक मोमीन यांची एम. एम असोसिएटस आणि वास्तू प्रॉपर्टीज एजन्सी नावाची जमीन खरेदी विक्री करणारी संस्था आहे. अगरवाल आणि जसप्रीतसिंग राजपाल यांचे कोंढव्यातील ब्रह्मा काऊंटी सोसायटीच्या परिसरात असलेल्या जमिनीवरुन निवृत्ती कोपरे यांच्याशी वाद झाले होते. अगरवाल जुलै २०१९ मध्ये मोमीन यांना भेटले. जमिनीचा वाद मिटवून देण्यासंदर्भात त्याने विचारणा केली, तेव्हा मोमीन यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. दरम्यान, याप्रकरणात मध्यस्थी केल्यास दीड कोटी रुपये देण्याचा करार त्यांच्यात झाला. अग्रवाल व राजपाल यांनी मोमीन यांना संबंधित प्रकरण मार्गी लावण्यासाठी १८ लाख रुपये आगाऊ दिले. उर्वरित एक कोटी ३२ लाख रुपये जमिनीसंदर्भातील कामे पूर्ण झाल्यानंतर देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

ठरल्यानुसार, मोमीन यांनी अग्रवाल यांना जागेचा कायदेशीर ताबा मिळवून दिला. ३१ जुलै रोजी कोपरे कुटंबीय आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्यात करारनामा झाला. त्यानंतर मोमीन यांनी अग्रवालकडे उर्वरीत पैशांची मागणी केली. त्यावेळी अग्रवाल यांनी त्यास लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावरील त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले. "तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना जगायचे आहे का ?, जेवढे पैसे दिले आहेत. त्यावर समाधान मान. अन्यथा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येईल. तुला तुरुंगात पाठवू' अशी धमकी दिली. त्यानंतर मोमीन यांनी याबाबत पोलिस आयुक्तालयात तक्रार अर्ज दिला. त्यानंतर अग्रवाल व जसपाल यांनी मोमीन यांना बोलावून घेतले. त्यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली. मोमीन यांनी लष्कर न्यायालायत ही खासगी तक्रार दाखल केल्याने त्यांना पुन्हा बोलावून त्यांनी धमकावले होते. मुंबई उच्च न्यायालयात मोमीन यांची अग्रवालसमवेत भेट झाली, तेव्हा अग्रवाल याने त्यांना उच्च न्यायालयाच्या इमारतीवरून फेकून देण्याची धमकी दिली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com