Pune Crime: बनावट कंपन्या स्थापन करुन अडीच कोटी रुपयांची फसवणूक; पुण्यात दीडशेहून अधिक गुंतवणूकदारांची फसगत
फिर्यादी शिंदे यांनी ३९ लाख रुपयांचे जेसीबी यंत्र खरेदी करून कंपनीला दिले. मात्र, त्यांना पहिल्या महिन्यात केवळ ६० हजार रुपये मिळाले. संशय आल्याने त्यांनी चौकशी केली असता, हे यंत्र कात्रज-कोंढवा रस्त्यावर उंड्रीतील एका गोदामात सापडले.
पुणे: घनकचरा व्यवस्थापन क्षेत्राशी निगडित बनावट कंपन्या स्थापन करून दोन कोटी ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.