स्व. रतनचंद शहा यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त दिव्यांगासाठी देण्यात येणाऱ्या जयपुर फूटचे थाटात उद्घाटन
MGV26B15234
मंगळवेढा : येथे मोफत कृत्रिम अवयव अंगरोपण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पंढरपूर पालवी प्रतिष्ठानच्या प्रमुख मंगलाताई शहा, श्री विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल शहा, सचिव किसनराव गवळी व इतर.
.......
मंगळवेढ्यात मोफत कृत्रिम अवयव शिबिर
..........
मंगळवेढा : श्री विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रतनचंद शहा यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त ‘यंत्र हार्वेस्ट एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड व लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रिम यांच्या वतीने मोफत कृत्रिम अवयव अंगरोपण शिबिर (जयपूर फूट) आयोजित केले. या कार्यक्रमाच्या सुरवातीस स्व. रतनचंद शिवलाल शहा यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, पंढरपूर पालवी प्रतिष्ठानच्या प्रमुख मंगलाताई शहा यांच्या हस्ते, श्री विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल शहा, सचिव किसनराव गवळी, लायन्स क्लब पुणे सुप्रीमचे पदाधिकारी सूर्यकांत शहा आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष समाधान हेंबाडे, प्रकाश गायकवाड, मुजफ्फर काझी, सी. ए. नीलेश मर्दा, डॉ. शिवाजीराव पवार,प्र. प्राचार्य प्रो. डॉ. औदुंबर जाधव, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र गायकवाड, महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. पी. एम. होनराव, प्रा. डॉ. राजाराम पवार, दामाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुलेमान तांबोळी यांच्यासह विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक सूर्यकांत शहा यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्रकुमार जाधव यांनी तर औदुंबर जाधव यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

