

राजेगाव, ता. १३ ः ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे व गंभीर आजारांचे वेळेत निदान व्हावे, यासाठी राजेगाव (ता. दौंड) येथे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत कर्करोग तपासणी व निदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात भिगवण ग्रामीण रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सूर्या दिवेकर यांनी महिलांची तपासणी केली. महिलांमधील कर्करोगाचे वेळीच निदान होणे व वेळेत उपचार घेणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत डॉ. दिवेकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
या शिबिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तपासणीनंतर रुग्णांना त्यांचा वैद्यकीय अहवाल जागेवरच उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे रुग्णांचा वेळ व मानसिक ताण वाचण्यास मोठी मदत झाली.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रावणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत गायकवाड, आरोग्य निरीक्षक महादेव कोळी, आरोग्य सहाय्यक अर्जुन नागरगोजे, आरोग्य सेवक शहाजी नागवे, स्नेहा माडे, ऋषिकेश कळसकर, योगीराज घोडके, आरोग्य सेविका गंगमा लोणारे, सोनाली टिमगिरे, आशा गटप्रवर्तक सुप्रिया दळवी आणि सर्व आशा सेविकांनी परिश्रम घेतले.
यावेळी पंचायत समिती सदस्य संजय भोसले, सोपान चोपडे, सागर जाधव, राजेश राऊत, अमोल मोरे, शशिकांत वाघमारे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.