

Free Competitive Exam Coaching for Tribal Candidates in Manchar
esakal
मंचर : ‘‘राज्य सरकारच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मंचर (ता.आंबेगाव) येथील आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी मोफत प्रशिक्षण सत्र, प्रशिक्षणार्थी निवड प्रक्रिया व मुलाखती गुरुवारी (ता.२६) सकाळी अकरा वाजता होणार आहेत. https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईट पोर्टलवर नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे.’’ अशी माहिती मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख दि . अ .जामदार यांनी दिली.