श्री स्वामी समर्थ रुग्णालयात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपन्न, मोफत शिबिराचा ६२ रुग्णांनी घेतला लाभ.
AKK26B05919
अक्कलकोट ः श्री स्वामी समर्थ रुग्णालयात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर शुभारंभप्रसंगी नगरसेवक महेश इंगळे, राजेश मलंग, मनोज काटगाव व अन्य.
श्री स्वामी समर्थ रुग्णालयात
मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
अक्कलकोट, ता. १ ः येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर झाले. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश मालक इंगळे यांनी आयोजन केले होते. ६२ रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.
वटवृक्ष देवस्थान संचलित श्री स्वामी समर्थ रुग्णालय आणि सांगली येथील नंदादीप मेडिकल केअर फाउंडेशन यांच्या वतीने हे शिबिर झाले. किणीचे डॉ.जगदीश तुळजापूरकर व राजेश मलंग यांनी सेवा दिली. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचालित मैंदर्गी रोडवरील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात हे शिबिर झाले. महेश इंगळे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. ६२ पैकी काही रुग्णांना सांगली येथील जीवनदीप नेत्र रुग्णालय येथे मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठविल्याचे इंगळे यांनी सांगितले. प्रारंभी प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून या शिबिराचा प्रारंभ झाला. मनोज काटगाव, अंकुश केत, राजू एकबोटे, हुंडेकरी, रमेश शिंदे, रवि मलवे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

