Shirur Crime : शिरूर पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारात दोन गटांत झोंबाझोबीसह लाथाबुक्क्यांची फ्रि स्टाईल; महिलांचाही सहभाग

शिरूर पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारात दोन गट एकमेकांना भिडले. महिलांचाही सहभाग असलेल्या या गटांत सुमारे वीस मिनीटांहून अधिक काळ झोंबाझोबीसह लाथाबुक्क्यांची फ्रि स्टाईल चालू होती.
two groups clashed within the premises of the Shirur Police Station

two groups clashed within the premises of the Shirur Police Station

sakal

Updated on: 

शिरूर - शिरूर पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारात आज दुपारी दोन गट एकमेकांना भिडले. महिलांचाही सहभाग असलेल्या या गटांत सुमारे वीस मिनीटांहून अधिक काळ झोंबाझोबीसह लाथाबुक्क्यांची फ्रि स्टाईल चालू होती. बघ्यांची गर्दी जमल्याने या परीसरात तणावाचे वातावरण पसरले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तरीही दोन्ही बाजूचे लोक पोलिसांसमोर एकमेकांवर धावून जात शिव्यांची लाखोली वाहात होते.

Loading content, please wait...