

अकलूजमध्ये आरोग्य शिबिराचा १,२७५ रुग्णांना लाभ
अकलूज, ता. १० ः श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मोफत आरोग्य शिबिराचा ७६५ महिला व ५१० पुरुष अशा एकूण १,२७५ रुग्णांनी लाभ घेतला. शिबिरात कर्करोग, नेत्ररोग, अस्थिरोग, हृदयरोग तसेच रक्ताच्या विविध तपासण्या करण्यात आल्या.
जिजामाता कन्या प्रशालेत झालेल्या या शिबिराचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सहकारमहर्षीचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील, नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील, डॉ. एम. के. इनामदार, डॉ. सतीश दोशी, डॉ. अपर्णा सरवदे, डॉ. मानसी गांधी, डॉ. सुरेश सूर्यवंशी, डॉ. अमोल शिंदे, डॉ. सचिन सावंत, डॉ. रावसाहेब गुळवे, डॉ. सविता गुजर, डॉ. रेवती राणे, कार्यकारी संचालक सुहास यादव, मंडळाचे सचिव अभिजित रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील, विविध संस्थांचे संचालक व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सयाजीराजे मित्र मंडळ, शंकरराव मोहिते-पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट, शंकरनगर अकलूज, शिक्षण प्रसारक मंडळ, सहकारमहर्षी साखर कारखाना, नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, बार्शी, उपजिल्हा रुग्णालय, अकलूज आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, शंकरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रुग्णांच्या मनातील कर्करोगाची भीती दूर करण्यासाठी आणि त्यांच्यावर मोफत उपचारासाठी अशा शिबिरांची गरज आहे. या शिबिरातून एखाद्या रुग्णाचे प्राण वाचले तरी शिबिराचे यश आहे, असे डॉ. एम. के. इनामदार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.