मंचरला आजपासून सर्वरोगनिदान शिबिर

मंचरला आजपासून 
सर्वरोगनिदान शिबिर
Published on: 

मंचर, ता. १ : राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे सोमवार (ता. २) ते गुरुवार (ता. ५) दरम्यान मोफत सर्वरोगनिदान, उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रजनी प्रकाश फाउंडेशन व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी दिली.
सोमवारी डॉ. सदानंद राऊत व तज्ज्ञ डॉक्टर मधुमेह, हृदयविकार व किडनी विकारांची तपासणी करतील. मंगळवारी (ता. ३) मोतीबिंदू, तिरळेपणा व महिलांच्या आजारांवर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केल्या जातील. तसेच आश्रमशाळांतील मुलांची डोळ्यांची तपासणी व चष्मे वाटप होईल. शिबिरात ईसीजी, सीटी स्कॅन व रक्त तपासण्या मोफत केल्या जातील, असे उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात यांनी सांगितले.
गुरुवारी (ता. ५) सकाळी १० वाजता दिलीप वळसे पाटील व शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते आशा वर्कर यांना भेटवस्तू वाटप करून शिबिराचा समारोप होईल. या वेळी बाळासाहेब बेंडे, विवेक वळसे पाटील, विष्णू हिंगे उपस्थित राहणार आहेत. गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲड. प्रदीप वळसे पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.