

मंचर, ता. १५ : भीमाशंकर रुग्णालय व शीतल बागल मंडळाच्या वतीने मंचर नगरपंचायत सभागृहात ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात १५० नागरिकांची तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख सुरेश भोर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आंबेगाव तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव ज्ञानेश्वर शेटे, डॉ. नंदकुमार पोखरकर, शहर महिला प्रमुख शीतल बागल, भीमाशंकर हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते. अध्यक्ष बाळासाहेब खानदेशे यांनी प्रास्ताविक केले.
‘‘शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, डोळ्यांचे विकार आदी तपासण्या करण्यात आल्या. ४९ रुग्णांचे आजाराचे निदान झाले. या रुग्णांवर भीमाशंकर हॉस्पिटलच्या वतीने महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मुळव्याध, प्रोस्टेट ग्रंथी, किडनी स्टोन व मणक्याच्या विकारांवरील शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. तसेच अन्य पात्र रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा,’’ असे आवाहन भीमाशंकर हॉस्पिटलचे व्यवस्थापक विजय निघोट व शीतल बागल यांनी केले.
मंचर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण भक्ते व नगरसेवक वसंतराव बाणखेले यांनी नगरपंचायतीच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.