शिवरकर विद्यालयात मोफत आरोग्य तपासणी

शिवरकर विद्यालयात 
मोफत आरोग्य तपासणी
Published on

हडपसर, ता. १७ : येथील विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. औंध जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आयोजित या शिबिरात इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार करण्यात आले. डॉ. नितीन कदम, डॉ. विद्या भोईटे, परिचारिका सारिका परीट व स्वाती राणे यांच्या पथकाने ही तपासणी केली. ज्या विद्यार्थ्यांना अधिक उपचारांची गरज आहे, त्यांना पुढील उपचारांसाठी औंध रुग्णालयात संदर्भित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी वैद्यकीय पथकाचा सत्कार केला. यावेळी प्राचार्य लहू वाघुले, विजय जाधव, वहिदा अवटी, दीपा व्यवहारे, आशा भोसले यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्य वाघुले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com