रमजान ईद निमित्त मंगळवेढ्यात ३ हजार लिटर मोफत दूध वाटप — मा.अनिल (दादा) सावंत फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
MGV26B15602
मंगळवेढा : अनिल सावंत फाउंडेशनतर्फे मुस्लिम बांधवांना मोफत दूध वाटप करताना मान्यवर.
---
ईदनिमित्त मंगळवेढ्यात
३ हजार लिटर दूध वाटप
अनिल सावंत फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. २१ : रमजान ईदच्या पूर्वसंध्येला सामाजिक ऐक्य व बंधुभावाचा संदेश देत अनिल (दादा) सावंत फाउंडेशन, पंढरपूर- मंगळवेढा यांच्या वतीने मंगळवेढा शहरात मोफत दूध वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत सुमारे तीन हजार लिटर दूध मुस्लिम बांधवांना वितरित करण्यात आले.
ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमाला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील विविध भागांत दूध वाटप करण्यात आले. या माध्यमातून समाजात परस्पर सहकार्य, बंधुभाव आणि एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सामाजिक सलोखा आणि एकजूट वाढविण्याच्या उद्देशाने फाउंडेशनतर्फे सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असल्याचे आयोजकांनी सांगितले. सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करणे हीच खरी एकात्मतेची ओळख असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत, माजी उपनगराध्यक्ष मुझफ्फर काझी, माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, अंबादास बेंद्रे, किसन गवळी, संतोष रदवे, सुलेमान तांबोळी, जमीर इनामदार यांच्यासह फाउंडेशनचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

