

बारामती, ता. २३ : दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव उपलब्ध करून देण्याच्या सामाजिक उपक्रमांतर्गत बारामती येथे मोफत कृत्रिम पाय व हात मोजणी शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर रविवारी (ता. ३०) सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत मएसो विद्यालय मुलांची शाळा येथे होणार आहे.
स्व-आधार दिव्यांग मदत केंद्र आणि बीव्हीपी साऊथ पुणे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या प्रकल्पांतर्गत तसेच भारत विकास परिषद, दक्षिण पुणे शाखा आणि पिंपरी-चिंचवड शाखेच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
बाजारात ५० हजार रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेले कृत्रिम मॉड्युलर पाय व हात पात्र दिव्यांगांना या उपक्रमांतर्गत पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिबिरामध्ये गरजू दिव्यांगांच्या कृत्रिम पाय अथवा हातासाठी आवश्यक मोजमाप घेण्यात येणार आहे.
शिबिराचा लाभ घेण्यासाठी पूर्वनोंदणी अनिवार्य आहे. कृत्रिम पाय किंवा हाताची आवश्यकता असलेल्या दिव्यांग व्यक्तींनी शिबिरापूर्वी आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नोंदणीसाठी संपर्क : पाध्ये – ९५५२६१८९००, खानापूरकर – ९९२२९९१८५०.