
पुणे : बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालय यांच्या त्वचाविकार विभाग व पुणे शाखेच्या इंडियन असोसिएशन ऑफ डर्मेटॉलॉजिस्ट्स, व्हेनेरिऑलॉजिस्ट्स आणि लॅप्रॉलॉजिस्ट (आयएडीव्हीएल) यांच्या सहकार्याने रविवारी (ता. १३) ससून रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या बाह्यरुग्ण विभाग येथे मोफत त्वचा आरोग्य तपासणी आणि जनजागृती शिबिर आयोजित केले होते.