मोफत शिबिराचे उदघाटन

मोफत शिबिराचे उदघाटन
Published on

मोफत सुवर्णबिंदू प्राशन संस्कार शिबिराचे आयोजन
सोलापूर, ता. १६ : विडी घरकूल परिसरात मोफत सुवर्णबिंदू प्राशन संस्कार शिबिराचे आयोजन गुरुवारी (ता. २१) करण्यात आले आहे. श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखी संघम, कौशल्या बहुउद्देशीय संस्था तसेच सोमा क्लिनिक-वैष्णव मारुती मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जुना विडी घरकूल येथील वैष्णव मारुती देवस्थान मंदिरात हे शिबिर होणार आहे.
कार्यक्रमाच्या उद्‍घाटनप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे, नगरसेवक प्रथमेश कोठे, नगरसेवक सतीश सिरसिल्ला, डॉ. अजय पोन्नम, युवराज सरवदे, नगरसेविका दिपिका यलदंडी, उज्वला दासरी, शारदा रामपुरे आणि डॉ. शिवानी सोमा उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरास लहान मुला-मुलींसह पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वैष्णव मारुती मेडिकलचे सुधाकर गुंडला, कौशल्या बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक वासुदेव यलदंडी, फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, नागेश सरगम आणि मार्गदर्शक मदनमोहन बुर्गूल यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मो. क्र. ९०२१५५१४३१ वर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com