...रूग्णालयांसाठी विभागीय आयुक्‍तांचे नविन आदेश; काय आहेत वाचा सविस्तर

maisekar.jpg
maisekar.jpg

पुणे : चॅरीटेबल ट्रस्ट अंतर्गत नोंदणी असलेल्‍या रूग्णालयांना निर्धन रुग्णांसाठी 10 टक्के खाटा आरक्षित ठेऊन मोफत उपचार करावेत. तसेच, आर्थिक दुर्बल घटकांसाठी 10 टक्के खाटा राखीव ठेवून 50 टक्के दराने उपचार करणे बंधनकारक असल्याची माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी दिली.

नोंदणीकृत खासगी रुग्णालये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करीत आहेत. काही रुग्णालये विमा संरक्षण उपचार पॅकेजनुसार दर आकारणी करतात. तर काही रूग्णालये विशिष्ट करार करून त्‍यांच्याशी झालेल्‍या दर करारानुसार रूग्णांना उपचार दर आकारणी करतात. तथापि, विमा संरक्षण नसलेल्‍या किंवा विमा संरक्षण मर्यादा संपलेल्या व्यक्तींना काही रूग्णालयांकडून मोठ्या प्रमाणात दर आकारणी केली जाते. त्यामुळे सरकारकडून याबाबत अधिक लक्ष दिले जात आहे. एकूण बेड्सपैकी 80 टक्‍के खाटांचे  सरकारमार्फत दर नियंत्रित करण्यात येत आहेत. हे

कोवीडसाठीच्या आयसोलेशन (विलगीकरण) आणि नॉन कोविड उपचारासाठीही लागू राहतील. उर्वरित 20 टक्‍के बेड्सवरील रूग्णांसाठी रूग्णालय त्यांच्या दराने शुल्क आकारणी करू शकतील. कोविडच्‍या रूग्णाच्या उपचाराचे कमाल दर निश्चित केलेले आहेत. नॉन कोविडसाठी सरकारने दर नियंत्रित केलेले आहेत. 
एनजीटीला शासकीय कामांची 'लागण'; न्यायाधीश, तज्ज्ञांची निवड कोरोनामुळे...
रुग्णालयांनी दर्शनी भागात फलक लावावेत : रुग्णालयातील दर्शनी भागात नोंदणीकृत खाटांची संख्या, रुग्णालयात त्‍यापैकी उपलब्ध खाटांची संख्या, 80 टक्‍के आणि 20 टक्‍के विभागलेल्या खाटांची संख्या आणि नियमानुसार दरतक्ता याचा फलक लावणे बंधनकारक आहे. प्रत्येक रूग्णांना खाटा, दर यांची माहिती समजून सांगण्याची व त्यानुसार दर आकारणी याची जबाबदारी रुग्णालयाची असेल. रूग्णालयासाठी वेळोवेळी प्रशासनाला याबाबत माहिती देणे बंधनकारक आहे.  नियमानुसार दिलेल्या पॅकेजमध्ये डॉक्टरांच्या शुल्क समावेश आहे. संबंधित डॉक्टरांकडून रूणावर उपचार करून घेणे ही रुग्णालयाची जबाबदारी आहे, असे डॉ. म्हैसेकर यांनी स्‍पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com