Pune : शिक्षकांसाठी आज मोफत वेबिनार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : शिक्षकांसाठी आज मोफत वेबिनार
पुणे : शिक्षकांसाठी आज मोफत वेबिनार

पुणे : शिक्षकांसाठी आज मोफत वेबिनार

पुणे - सकाळ माध्यम समूहाच्या ‘सकाळ एनआयई’ (न्यूज पेपर इन एज्युकेशन) व सकाळ इंडिया फाउंडेशन उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी मागील काही महिन्यांपासून ‘मैत्री डिजिटल युगाशी’ ही ऑनलाइन स्वरूपातील मोफत मार्गदर्शन कार्यशाळांची मालिका झूम वेबिनारद्वारे होत आहे. या उपक्रमास सर्व शिक्षक वर्गांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील एकोणीसावी कार्यशाळा ‘एकविसाव्या शतकात शिकण्याच्या विविध सुविधा’ याविषयी नायजेरिया देशातील आंतरराष्ट्रीय सर्वसमावेशक शिक्षण, कोडिंग, स्टीम शिक्षण पद्धती आणि उद्योजकता या विषयांचे प्रशिक्षक सोजी मेगबोवोन यांची शनिवारी (ता. २०) दुपारी साडेचार वाजता ऑनलाइन झूम वेबिनारच्या माध्यमातून मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.

सोजी मेगबोवोन लागोस येथील जाकांदे कॉम्प्रेहेन्सिव्ह सिनिअर कॉलेजमध्ये कार्यरत असून, ते नायजेरियातील २०१९ मधील प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार विजेते तसेच २०१९ मध्ये ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी अंतिम पन्नास स्पर्धकांमध्ये निवड झालेले कौशल्याधिष्टित शिक्षक आहेत.

यावर होणार मार्गदर्शन

१. २१ व्या शतकातील शिकण्याच्या सुविधा

जागतिक जागरूकता , व्यवसाय आणि आर्थिक साक्षरता , नागरी साक्षरता, आरोग्य साक्षरता , पर्यावरण साक्षरता , माहिती तंत्रज्ञान साक्षरता , माध्यम साक्षरता , माहिती साक्षरता , जीवन आणि करिअर कौशल्ये, सामाजिक आणि सांस्कृतिक कौशल्ये, उत्पादकता आणि जबाबदारी, नेतृत्व आणि जबाबदारी

२. नाविन्यपूर्ण कौशल्ये

समीक्षा व समग्र विचार, सहयोग, सर्जनशीलता, संवाद आणि प्रकल्प आधारित शिक्षण व सामाजिक नव-उपक्रम

loading image
go to top