अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी शंभरहून अधिक कलावंतांचे पत्रक

अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी शंभरहून अधिक कलावंतांचे पत्रक
Published on: 

पुणे, ता. ३१ : बिकानेर हाउस येथील छायाचित्रकार रेहान वाड्रा यांच्या छायाचित्र प्रदर्शनातून काही छायाचित्रे काढून टाकण्याच्या घटनेचा निषेध करत महाराष्ट्रातील १०० हून अधिक कलावंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ पत्र प्रसिद्ध केले आहे. कोणत्याही सुसंस्कृत समाजात सर्जनशील व्यक्तींना मुक्त वातावरणाची गरज असते, असे मत या पत्राद्वारे व्यक्त करण्यात आले आहे.

‘‘ज्या देशांमध्ये असहिष्णुता वाढीस लागते किंवा जेथे सत्ताधारी व्यवस्था प्रत्येक प्रकारच्या असहमतीला दडपून टाकण्याचा प्रयत्न करते, तिथे कलाकार सहज लक्ष्य होतात. अशा वेळी कलाकारांच्या समुदायाने पीडित कलाकारांच्या आणि त्यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे. बिकानेर हाउसमध्ये घडलेली ही घटना दडपशाहीची कृती असून आम्ही त्याचा निषेध करत आहोत,’’ असे या पत्रात नमूद केले आहे.

संदेश भंडारे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या या पत्राला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये छायाचित्रकार, नाटककार, लेखक, कवी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यात जयंत भीमसेन जोशी, वसंत आबाजी डहाके, गणेश देवी, राजन गवस, लक्ष्मीकांत देशमुख, निखिल वागळे, राजू बाविस्कर, संभाजी तांगडे, ओंकार गोवर्धन, सुनील कर्णिक, विजय सातोरकर, सुबोध मोरे यांच्यासह अनेक नागरिकांनी स्वाक्षरी केली आहे. कलाकृतींच्या माध्यमातून व्यक्त होण्यासाठी कोणत्याही अडथळ्याविना वातावरण मिळावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.