
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. भोसरी, पिंपरी, चिंचवड, शाहूनगर, थेरगाव, हिंजवडी, वाकडसह अनेक भागांत दिवसातून अनेक वेळा आणि अचानकपणे वीज बंद होत आहे. यामुळे नागरिकांच्या रोजच्या व्यवहारात अडथळा निर्माण होत असून उद्योगधंद्यांनाही मोठा फटका बसत आहे.