पुणे : बहिणीशी प्रेमसंबधाच्या रागातून केला मित्राचा खून

murder.jpg
murder.jpg

पुणे ; खडकवासला येथील अविनाश बापू इंगळे या सतरा वर्षाच्या युवकाचा प्रेम संबंधाच्या कारणावरून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. हवेली पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

इंगळे हा खडकवासला परिसरात मजुरी काम करीत होता. त्याचा खून सुरेश ठाकूर व निलेश सहाय( दोघेही रा. गोऱ्हे बुद्रुक) या दोघांनी केला आहे. ते दोघे ही फरार आहेत. अशी माहिती हवेली पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक शेळके यांनी सांगितले. 

पोलिसांच्या माहितीनुसार, "इंगळे याचे सुरेश ठाकूर यांच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. सोमवारी इंगळे तिला भेटण्यासाठी गोऱ्हे बुद्रुकला तिच्या घरी गेला होता. तो घरात असताना ठाकूर यांचे वडील घरी आले. त्यानंतर लगेच तेथे सुरेश ठाकूर घरी परतला. त्याने मित्र निलेश सहाय्य याच्या मदतीने दुचाकीवरून इंगळे याला गाडीवर घेऊन खानापुरच्या दिशेने निघून गेले. 

दरम्यान, रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास इंगळे यांची बहीण हवेली पोलिस ठाण्यात 'भाऊ दुपारी मैत्रिणीला भेटण्यासाठी गोऱ्हे बुद्रुक येथे गेला आहे. परंतु तो परतला नाही. तेथून तो सुरेश बरोबर गेला आहे. तो परतला नाही. अशी अपहरण केल्याची तक्रार घेतली. सुरेश ठाकूर यास इंगळे बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणाचा राग आला होता. त्या रागाच्या भरात मित्राच्या मदतीने त्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केला. त्यास जखमी करून त्याला खडकवासला धरणाच्या नदीपात्रात नदीपात्रात ढकलून दिले. 

अविनाश याचा मृतदेह आज मंगळवारी सकाळी खानापूर गावालगत नदीत आढळला. पोलीस पाटील गणेश सपकाळ यांनी हवेली पोलिस ठाण्याला घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. त्यानंतर तो त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com