esakal | Pune Crime : गुगल पे करताना झालेली मैत्री तरुणीला पडली महागात
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Pune Crime : गुगल पे करताना झालेली मैत्री तरुणीला पडली महागात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : हॉटेलचे पैसे देण्यासाठी गुगल पे ऍपचा वापर करताना तरुणाने उच्चशिक्षीत तरुणीसमवेत ओळख वाढविली. त्यानंतर तरुण व त्याच्या मित्राने तरुणीला ब्लॅकमेल करीत, मारहाण करून लैंगिक अत्याचार करून त्याचे चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आहे. तर एका मित्राने तरुणीवरील अत्याचाराचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारीत करुन बदनामी केली. अखेर तरुणीने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी तिघांनाही बेड्या ठोकल्या.

विकी ऊर्फ विकास विनायक राठोड (वय 21, रा.मारुंजी, मुळ रा.पैठण, औरंगाबाद), निखील प्रताप पाटील (वय 31, रा.मारुंजी गाव, मुळ रा. खरोसा,औसा, लातूर), अमर गोरखनाथ राठोड (वय 23, रा. थापटी,तांडा,ता.पैठण,जि.औरंगाबाद ) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुनसार, तरुणी शहरात शिक्षण घेत असून ती वसतिगृहामध्ये राहते. रविवारी खानावळ बंद असल्याने ती तिच्या मैत्रीणीसमवेत जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेलमध्ये गेली होती. जेवण झाले, मात्र तिच्याकडे गुगल पे नसल्याने तिने तेथे असलेल्या विकीला विनंती केली. त्याने गुगल पे करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते झाले नाही. त्यानंतर दोघांची ओळख होऊन मैत्री झाली. विकी व त्याच्या मित्राने पिडीतेशी ओळख वाढविली. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून त्याचे चित्रीकरण गावाकडील मित्राला पाठविले. त्याने संबंधीत चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारीत केले.

दरम्यान, हा प्रकार थांबण्याचे चिन्हे दिसत नसल्याने अखेर तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले. तेथे तिच्यासोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखुन गुन्हा दाखल केला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली.

loading image
go to top