Shirur Crime : इन्स्टाग्रामवर मैत्री! अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

इन्स्टाग्रामवर झालेल्या मैत्रीतून प्रेमाचे नाटक करीत एकाने मुलीला आपल्या घरी नेऊन अत्याचार केला.
crime
crimesakal
Updated on

शिरूर - इन्स्टाग्रामवर झालेल्या मैत्रीतून प्रेमाचे नाटक करीत एकाने मुलीला आपल्या घरी नेऊन अत्याचार केला. कारेगाव (ता. शिरूर) येथे घडलेल्या या प्रकारातील मुलगा व मुलगी अल्पवयीन आहेत. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी आज याबाबत गुन्ह्याची नोंद केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारेगावमधे राहणाऱ्या सोळावर्षीय मुलाने एका चौदा वर्षांच्या मुलीसोबत सोशल इन्स्टाग्रामवर ओळख करून मैत्री केली. दरम्यान या ओळखीतून प्रेमाचे नाटक करून मुलीला आपल्या घरी नेले. मला तू खूप आवडते, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, असे म्हणत गुरुवारी (ता. ६) व शुक्रवारी (ता. ७) मुलीवर त्याने घरातच अत्याचार केले.

मात्र, पीडित मुलीला घराबाहेर सोडताना, याबाबत कुणाला काही सांगितले तर जिवे मारून टाकीन, अशी धमकी दिल्याने घाबरलेल्या मुलीने कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला.

पीडितेच्या कुटुंबीयांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेत या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध बाललैंगिक अत्याचार व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी विधीसंघर्षित मुलाला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com