
काटेवाडी : ढेकळवाडी (ता. बारामती) येथील अनिकेत दत्तात्रेय सूळ याने सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत यश मिळवत गावाचा लौकिक वाढवला आहे. त्याच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी त्याचा सत्कार करत कौतुकाचा वर्षाव केला. अनिकेत याचे वडील दत्तात्रेय सूळ हे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत आहेत.