भोर : केंजळ (ता. भोर) येथील शेतकरी कुटुंबातील सोहम प्रशांत बाठे याने पहिल्याच प्रयत्नात सनदी लेखापालची (सी.ए.) परीक्षा उत्तीर्ण होऊन केंजळमधील पहिला सनदी लेखापाल होण्याचा मानही मिळवला आहे..इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या वतीने मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेचा निकाल रविवारी (ता. ६) ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. त्यामध्ये सोहम बाठे याने यश संपादन केले. सोहम याचे आई-वडील केंजळमध्ये पारंपारिक शेती करीत आहेत. वडील प्रशांत बाठे हे स्वतः पदवीधर असल्यामुळे त्यांनी आपल्या दोन मुली व एक मुलगा यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठबळ दिले. सोहम याची एक मोठी बहिण ही सॉप्टवेअर इंजिनिअर असून दुसरी बहीण नुकतीच शासकीय सेवेत दाखल झाली आहे. दोन्ही बहिणींनी उच्च शिक्षण घेतल्यामुळे आपणही शिक्षणात यश गाठण्याची जिद्द त्याने मनाशी बाळगली आणि ती पूर्णही केली..सोहम याने केंजळच्या प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील ज्ञानसंवर्धीनी विद्यालयात इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये इयत्ता अकरावी ते पदवीर्यंतचे (बीकॉम) पशिक्षण पूर्ण केले. पदवीचे शिक्षण घेतानाच सोहम याने सीएच्या परीक्षेचा अभ्यास सुरु केला. .पुण्यातील एका सनदी लेखापाल यांच्याकडे त्याने कामही केले. काम सुरु असताना त्याने पुण्यातील घरामध्ये राहून दररोज चार तास अभ्यास केला. बहिणीसोबत घरातील घरकामे करून त्याने ऑनलाइन अभ्यासही केला. आपल्या मोबाईलचा उपयोग ऑनलाइन अभ्यासासाठी केला. त्यामुळे मला यश गाठता आल्याचे सोहम अभिमानाने सांगत आहे..वडिलांकडून शिक्षणाची मिळालेली प्रेरणा, आईचे आणि बहिणींचे प्रेम याबरोबर मोबाईलचा उपयोग अभ्यासासाठी जास्त केल्यामुळे मला यश मिळवता आले. सोशल मीडियाचा उपयोग अभ्यासासाठी योग्य पद्धतीने केल्यास आपले स्वप्न साकार होण्यास अडचण येणार नाही.- सोहम बाठे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.