MPSC Exam Result : शेतकरी कुटुंबातील तरुण झाला सहायक राज्यकर आयुक्त
‘मूर्ती लहान पण, कीर्ती महान’ या उक्तीप्रमाणे अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी व सातत्यपूर्ण अभ्यास करून रांजणगाव गणपती येथील प्रतीक लांडेने मिळविले घवघवीत यश.
तळेगाव ढमढेरे - रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील शेतकरी कुटुंबातील प्रतीक लांडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याने सहाय्यक राज्यकर आयुक्त वर्ग- १ पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे.