
न्हावरे : लहानपणी वडिलांचे छत्र हरपले...घरची परिस्थिती बेताचीच...त्यातच मुलाने सनदी लेखापाल होण्याची जिद्द धरली...मुलाच्या या जिद्दीला आई व भावाकडून पाठबळ मिळाले अन् केलेल्या कष्टाचे चीज झाले. लेकाने परिस्थितीवर व अनेक अडचणींवर मात करत अखेर चौथ्या प्रयत्नात का होईना परिसरात सीए होण्याचा मान मिळवला, यामुळे आई व भाऊ, मामा, आदी नातेवाईक व ग्रामस्थांना गगन ठेंगणे झाले. शिरूर तालुक्यातील आंबळे येथील संकल्प संजय काळे या मुलाची ही यशोगाथा.