Nylon manja
sakal
पुणे - जानेवारी महिना सुरू झाला की, आकाशात रंगीबेरंगी पतंग दिसू लागतात. मात्र, दुसऱ्याचा पतंग कापणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जात असल्याने अनेक जण धोकादायक आणि बंदी असलेला नायलॉन मांजा वापरण्यासही मागेपुढे पाहत नाहीत.
हाच नायलॉन मांजा सध्या पक्ष्यांसाठी आणि नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. नायलॉन मांजाच्या विक्रीवर व वापरावर कडक बंदी घातलेली असतानाही, पुण्यात अनेक ठिकाणी छुप्या मार्गाने या घातक मांजाची विक्री होत असल्याचे वास्तव दै. ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे.