
पुणे : आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत, डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगत वंचित घटकातील विद्यार्थ्यांनी केवळ मेहनतीच्या बळावर अवघड अशा वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी झालेल्या ‘नीट’ परीक्षेत यश मिळविले. पुण्यातील गरजू विद्यार्थ्यांना ‘लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट’ (एलएफयू) या स्वयंसेवी संस्थेतर्फे नीट या प्रवेशपरीक्षेचे विनामूल्य मार्गदर्शन करण्यात आले. त्यातील अनेक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत यश मिळविले आहे.