
पुणे : ‘‘मला राजकारणातील लोभाचे आकर्षण कधीच वाटले नाही. आपल्याला आवश्यक तेवढे घ्यावे, बाकी इतरांना द्यावे, दुसऱ्यांना मोठे करण्यातच मला आनंद आहे. हेच काम मी आता पुण्यासह अन्य ठिकाणी करत आहे,’’ असे सांगत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा एक कार्यकर्ता ते नेता होण्यापर्यंचा प्रवास मांडला.